*वरोरा तालुक्यातील पोथरा नदीतून रेती तस्करावर पोलीस प्रशासनाची कारवाई.*
*आठ लक्ष सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त…*
प्रशासनाला सर्वात मोठा महसूल मिळवून देणारा घटक म्हणून खनिज साठ्याकडे बघितल्या जाते त्यापैकी मुख्य खनिज साठा म्हणजे रेती असून सध्या शासनाकडून रेती घाटाचा लिलाव न झाल्याने शासकीय कामासह अन्या कामांवर रेती अनुपलब्ध होत असल्यामुळे व रेतीची मागणी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने या संधीचा फायदा घेत खांबाळा .बोपापुर. बारव्हा येथील काही ट्रॅक्टर मालक झटपट श्रीमंत बनण्याच्या नादातून वरोरा परिसरात वरदान म्हणून लाभलेल्या पोथरा नदीतून प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता रेतीचा उपसा करून रेतीचा ढीग करून पंधरा मिनिटात आपली तस्करीची कारवाई पूर्ण करून आजू बाजूच्या परिसरात चढ्या भावाने रेती विक्री तस्करी करून करत होते या कामामध्ये त्यांनी चक्क तहसील ऑफिस ते रेती घाट व रेती वितरण करणार वाल्यांच्या स्थळा पर्यंत मोबाईल टावर प्रमाणे महसूल तथा पोलीस प्रशासनाची माहिती घेण्याकरिता एक मानवी शृंखल यंत्रणा उभी केली होती हा कारनामा गत अनेक दिवसापासून सुरू होता तस्करीमुळे प्रशासनाचे हजारो ब्रास रेती चोरीने लाखो रुपयाचे नुकसान झाले होते व सदर रेती तस्करांमध्ये प्रशासना व पत्रकार व त्यांच्यावरील दंड होणाऱ्या दंडात्मक कारवाई याबाबत मनामध्ये भीती नव्हती मात्र नव्याने रुजू झालेले आयपीएस उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नेतृत्व डीबी इन्चार्ज एपीआय योगेश सिंग यादव यांनी गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचात
नवनिर्वाचित अधिकारी यांच्या सहकार्याने धडक कारवाई.करत
तालुक्यातील पोथरा नदीतून २४ फेब्रुवारीला ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 एपी १८०७ त्याच्या सोबतच बिना नंबर रेती भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली व यासह दुसरा ट्रॅक्टर एम एच ३२ वाहन क्रमांक ०४२२ यासह रेतीने भरलेली ट्रॉली एम एच 40 ए.६४३४ यांच्यावर कारवाई करत आठ लक्ष सात हजार रुपयाचा चा माल जप्त करत ट्रॅक्टर ड्रायव्हर आकाश लक्ष्मण ऊईके वय 26 वर्ष गाव बारवा वरोरा कपिल लक्ष्मण ढेकणे वय 21 वर्ष गाव खांबाळा वरोरा व वसंता दिलीप बावणे वय 43 वर्ष गाव खंबाळा यां तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरोरा पोलिसांनी कारवाई करून ट्रॉली गाडीवर नंबर नसताना पोलिसांनी आरटीओ कार्यालय पासिंग साठी चौकशी रिती चोरी साठी उपयोग ट्रॅक्टर कर्मशियल किंवा एग्रीकल्चर या रेती चोरट्यांनी आज पर्यंत किती ब्रास चोरी केली याबाबत अधिक चौकशी होणार आहे सदरहू कारवाई पोहवा दिलीप सुर, पोअं शशांक बदामवार, नितीन तुराले नितीन गाउत्रे यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.. या कारवाईमुळे अनेक रेती तस्कर भूमिगत झाले असून जी कारवाई महसूल प्रशासनाने करायची होती ती कारवाई पोलीस प्रशासनाने केल्यामुळे या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे..






