NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील वल्लरी अविकांत पाल हिची निवड

0
58

*आनंदराव कुळे, संपादक

मूल (मानवाधिकार २४ न्यूज ) : – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र सरकारमार्फत आयोजित करण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शिष्यवृत्तीप्राप्त प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.
या शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत विद्यालय मुल येथील कुमारी वल्लरी अविकांत पाल ही विद्यार्थिनी पात्र ठरली.
याचे संपूर्ण श्रेय नवभारत विद्यालय मूल चे मुख्याध्यापक, शिक्षक आणि तिचे पालकांना देते.
नवभारत विद्यालय मूल चे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here