मालधक्का निर्मितीचा विषय शासनाकडुन अधिकृतरित्या स्थानिक प्रशासनाकडे आलाच नाही, उपविभागीय अधिकारी अजय चरडे ह्यांनी मांडली स्थानिक प्रशासनाची भुमीका, शांतता ठेवण्याची केली नागरीकांना विनंती

0
12

आनंदराव कुळे, संपादक

मूल (मानवाधिकार २४ न्यूज ) : –  वृत्तपत्रातील बातम्या आणि प्राप्त झालेल्या निवेदनावरून मालधक्क्यचा विषय आमच्या समोर आला, परंतु शासनाकडुन स्थानिक महसुल प्रशासनाला अद्याप मालधक्का विषयी कोणतेही अधिकृत पञ किंवा आदेश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे चर्चेवर विश्वास न ठेवता शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करावे. अशी विनंती उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासुन मूल शहरात रेल्वे मालधक्क्याचा विषय चर्चेचा झाला असुन यामुळे भविष्यात शहरातील शांत वातावरण अशांत होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर वास्तविक परिस्थिती जाणुन घेण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची भेट घेतली. संतोषसिंह रावत यांनी मालधक्क्याविषयी प्रकाशित झालेल्या बातम्यांचे काजण देत याविषयी शासनाची भुमीका आणि वास्तविक परिस्थिती विषयी चर्चा केली. तेव्हा उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी मालधक्का विषयी केंद्र आणि राज्य शासनाकडुन अद्याप स्थानिक प्रशासनाला कोणतेही पञ किंवा आदेश प्राप्त झालेले नाही. रेल्वे स्टेशन लगत मालधक्का निर्माण करावयाचे झाल्यास रेल्वे प्रशासनाला महसुल आणि वन विभागाकडुन जमीन भुसंपादनाची कार्यवाही करणे अनिवार्य आहे. परंतु अद्याप भुसंपादना विषयी कोणतेही आदेश किंवा पञ प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सध्यातरी मूल शहरालगत मालधक्का प्रस्तावित आहे. असे महसुल अधिकारी म्हणुन सध्यातरी मला म्हणता येणार नाही. असे उपविभागीय अधिकारी चरडे यांनी सांगीतले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, बाजार समिती सभापती तथा नगर परीषद उपाध्यक्ष राकेश रत्नावार, पाणी पुरवठा सभापती विलास कागदेलवार, खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, नगरसेवक बंडु गुरनुले, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रूमदेव गोहणे, काँग्रेस पदाधिकारी धनराज रामटेके आदी उपस्थित होते. तहसिलदार मृदुला मोरे ह्यांनीही मालधक्का विषयी शासनस्तरवरून कोणताही पञव्यवहार झालेला नसल्याचे सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here